रेतीचा धुराळा लवकरच उडणार.... चित्रपटाचे ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 18:41 IST2016-03-30T01:41:40+5:302016-03-29T18:41:40+5:30

           रेतीसम्राटांच्या काळ््या साम्राज्याला थेट भिडणारा व वाळूमाफियांचा हा विषय बेधडकपणे मांडण्यात आलेल्या रेती या ...

Sandy will fly soon ... launch the movie trailer | रेतीचा धुराळा लवकरच उडणार.... चित्रपटाचे ट्रेलर लाँच

रेतीचा धुराळा लवकरच उडणार.... चित्रपटाचे ट्रेलर लाँच


/>           रेतीसम्राटांच्या काळ््या साम्राज्याला थेट भिडणारा व वाळूमाफियांचा हा विषय बेधडकपणे मांडण्यात आलेल्या रेती या चित्रपटाची पहिली झलक आज प्रेक्षकांच्या समोेर आली आहे. देशभरातील आणि विशेषत: महाराष्ट्रात अनिर्बंधपणे सुरु असलेल्या वाळूची स्मगलिंग तसेच अगणित काळ््या पैशांसाठी बिनधास्तपणे वावरत असलेले वाळूमाफिया, भ्रष्ट सरकारी अधिकारी, पोलिस अन राजकारणांची साखळी यावर या चित्रपटामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. वाळू माफियांच्या निशाण्यावर असलेला रेती हा सिनेमा ८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत असुन त्याचा ट्रेलर आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये लाँच करण्यात आला.
               चित्रपटाची कथा रेखटणारे देवेन कापडणीस यांनी या चित्रपटातील संवाद हे खुद्द वाळू माफियांच्याच तोंडचे असल्याचे सांगितले. या विषयावर सखोल अभ्यास करुनच कथा लिहीली असल्याचे ते सांगतात. चित्रपट पाहताना प्रेक्षकांचे मनोरंजन तर झालेच पाहिजे परंतू थिएटर बाहेर निघताना त्यांना नक्कीच समजेल कि या महत्वपुर्ण प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. कोणताही सिनेमा हा सोल्युशन देत नाही तर तो आपल्याला समस्येवर विचार करायला भाग पाडतो आणि हा विषय सर्वसामान्य माणसाशी निगडीत असल्याने तो नक्कीच प्रेक्षकांना अपील होईल.
              चिन्मय त्याच्या भुमिकेविषयी सांगताना म्हणतो, शंकºया हा असा व्यक्ती आहे जो आपल्या प्रेयसीवर जीवापाड प्रेम करीत असतो. तिच्यासाठी काहीही करायला तो तयार असतो. तसेच तो ट्रक डायव्हर असल्याने त्याचे त्याच्या ट्रकवर अत्यंत प्रेम असुन तो लाडाने त्याच्या ट्रकला राणी म्हणतो. ट्रक मधुन वाळू वाहुन नेत असताना या माफियांच्या राज्यात आपल्यालाही वर पर्यंत पोहचायचेय अशी आकांक्षा त्याची असते. त्याला आपल्या लोकांविषयी जेवढे प्रेम आहे तेवढाच तो दुसºयाचाल जीव घेताना विचार न करणारा कठोर देखील असतो. एक प्रकारचा निबारपणा या कॅरॅक्टरमध्ये आहे. 

                     

             शंकºयाच्या प्रेमात अखंड बुडालेल्या सुलीची भुमिका रेती मध्ये गायत्री साकारत आहे. ती म्हणते, कथेला रिक्वायरर्ड असा हा रोल असल्याने जेवढी प्रेमकथा दाखवायला पाहिजे तेवढीत ती दाखविली आहे. उगाचच भुमिका खेचलेली नाही त्यामुळे ते रोमँटिक सीन्स पडद्यावर पहायला प्रेक्षकांना आवडतील.
               शशांक शेंडे यांनी वाळू माफियाची भुमिका यामध्ये साकारली असुन ते म्हणतात, प्रकाश झा ज्याप्रमाणे सत्यघटनांवर आधारीत चित्रपट बनवितात, तसाच रेती हा सिनेमादेखील रंजक घटनेवर आधारीत आहे. बºयाच दिवसांनी मराठीमध्ये चांगला अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा आलाय. रेती ही फिल्म चित्रमाध्यामाच्या इतकी जवळ जाणारी आहे की मी ती म्युट करुन देखील पाहु शकतो. संवादांची गरज भासत नसुन मुक चित्रपट देखील तुम्हाला समजु शकतो ही कमाल स्क्रीन प्ले अन डिरेक्शनची आहे. 
              चित्रपटाचे शुटिंग रिअल लोकेशनवर जाऊन आम्ही केले आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात ११० मल्टीप्लेक्स आणि १०० सिंगल स्क्रिनवर लागणार आहे. मार्केर्टिंगच्या बाबतीत आपण बॉलीवुडला कॉपी करतोय. प्रमोशन करण्यापेक्षा तुमच्या सिनेमाचा विषय अन कथा कशा प्रकारे मांडली आहे याला जास्त महत्व असते. अन प्रेक्षक पहिल्या दिवशीच सिमेना पाहुन तो चांगला आहे कि नाही याची पावती देतात. या सिनेमाच्या माध्यामातून शान मराठीत पदार्पण करीत आहे. आज अपल्याच संगीत दिग्दर्शकांकडे मराठी सिनेमांना संगीत द्यायला वेळ नाही तर हिंदीतील संगीतकार मराठी मध्ये येत आहेत.
                                                  - प्रमोद गोरे (निर्माते)
  यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना. 
बॉलीवुडचा सुपरस्टार गायक शान याने आपल्या आवाजाने रसिक मायबापांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील शानचा आवाज पोहोचला आहे. आता, पुन्हा हा सुपरस्टार गायक रेती या चित्रपटातून आपला आवाज पोहोचविण्यास सज्ज झाला आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना शान म्हणाला, रेती हा मराठी चित्रपट वास्तव परिस्थीतीशी संबंधित असून समाजाला एक नवीन विचार देणारा हा चित्रपट आहे. बºयाच वेळा सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकरणाची बॅक स्टोरी काय असते हे माहित नसते. यासंबंधित समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा हा चित्रपट असणार आहे. या सामाजिक चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच मला छान मराठी लिहीता, वाचता व स्पष्ट बोलता देखील येते. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. तसेच मराठी इंडस्ट्री ही भरारी घेत आहे त्यामुळे यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना.    
                                                                - शान (गायक)
...............................................................................................

Web Title: Sandy will fly soon ... launch the movie trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.