समीराचा मराठमोळा नवरा कसा आला लग्नात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 15:12 IST2016-12-18T15:12:43+5:302016-12-18T15:12:43+5:30
समीरा रेड्डीने बॉलिवूडमध्ये काही मोजकेच चित्रपट केले. सध्या समीरा चित्रपटसृष्टीमध्ये दिसत नसली तरी ती अता तिच्या संसारात चांगलीच रमली ...

समीराचा मराठमोळा नवरा कसा आला लग्नात?
स ीरा रेड्डीने बॉलिवूडमध्ये काही मोजकेच चित्रपट केले. सध्या समीरा चित्रपटसृष्टीमध्ये दिसत नसली तरी ती अता तिच्या संसारात चांगलीच रमली आहे. नुकताच तिने आपला वाढदिवस संपूर्ण कुटूंबासोबत साजरा केला. परंतू तुम्हाला माहित आहे का कि समीराचा नवरा हा एक मराठमोळा मुलगा आहे. होय, समीराने अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २०१४ मध्ये मराठमोळा बिझनेसमन अक्षय वदेर्सोबत लग्नगाठ बांधली. अक्षय बाइकचा व्यवसाय करतो. 'वर्देंची मोटरसायकल' म्हणून अक्षयच्या बाइक्सला ओळखले जाते. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाइकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. या लग्नात समीरा आणि अक्षयच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्र सहभागी झाले होते. समीराच्या लग्नाचे प्लानिंग तिची बहीण सुषमाने केले होते. समीराने गेल्यावर्षी २५ मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
![]()
![]()