आकाश ठोसरच्या एफयूचा फर्स्ट लूक सलमान खानने केला रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 13:02 IST2017-04-10T07:32:16+5:302017-04-10T13:02:16+5:30
सैराट या चित्रपटातील परशा या व्यक्तिरेखेमुळे आकाश ठोसरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्याचा दुसरा चित्रपट कधी येणार याची ...

आकाश ठोसरच्या एफयूचा फर्स्ट लूक सलमान खानने केला रिलीज
स राट या चित्रपटातील परशा या व्यक्तिरेखेमुळे आकाश ठोसरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्याचा दुसरा चित्रपट कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एफयू या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे आणि हा फर्स्ट लूक बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने रिलिज केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.
महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते असून या चित्रपटात आकाश ठोसरची भूमिका प्रमुख असणार आहे. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.
महेश मांजरेकर आणि सलमान खान हे एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. महेश मांजरेकरच्या प्रत्येक चित्रपटाच्या पार्टींला सलमान खान आवर्जून हजेरी लावतो आणि आता सलमानने त्याच्या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला आहे. सलमानने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सैराट फेम आकाश ठोसर परतला असून महेश मांजरेकरच्या एफयू या चित्रपटात तो झळकणार आहे. यासोबतच त्याने या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना केवळ आकाशचा हातच पाहायला मिळत आहे.
सैराट हा आकाश ठोसरचा पहिलाच चित्रपट होता. पण त्याच्या पहिल्याच चित्रपटातील परशा ही भूमिका गाजली. या चित्रपटामुळे तो एका दिवसांत सुपरस्टार बनला. आज तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
एफयू या चित्रपटात प्रेक्षकांना आकाश खूपच वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भूमिकेची चांगलीच उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये आहे.
![sairat akash thosar]()