कधीच लग्न करणार नाही ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू? सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 07:25 PM2023-10-27T19:25:04+5:302023-10-27T19:28:08+5:30

सध्या एका चाहत्याला रिंकूने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Sairat Fame Rinku Rajguru Talk About Her marriage | कधीच लग्न करणार नाही ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू? सोशल मीडियावर चर्चा

कधीच लग्न करणार नाही ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू? सोशल मीडियावर चर्चा

पहिल्याच सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू नागराज मंजुळे यांच्या  'सैराट' या सिनेमातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आणि आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. गेल्या काही काळापासून रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. सध्या एका चाहत्याला अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


नुकतंच रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशन ठेवलं होतं. याद्वारे तिनं चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिनं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्यानं तिला 'लग्न करुच नकोस' असा सल्ला दिला. यावर रिंकूनेही 'डन' असं उत्तर दिलं आहे. 

या सेशनमध्ये एका चाहत्याने तिला विचारलं की, मराठीमधील तुझे आवडते गाणे कोणते? चाहत्याच्या या प्रश्नावर रिंकूने लिहीलं की, ‘जोगवा.’ तर दुसऱ्या एका युजरने विचारलं की केदारनाथची ट्रिप कशी झाली. यावर रिंकूने म्हटलं, 'अविस्मरणीय'. याशिवाय तिनं तिचा आवडता पदार्थ पुरणपोळी असल्याचं सांगितलं. 


रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, २०१६ मध्ये तिने ‘सैराट’ मधून डेब्यू केलं. या चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या तिचा चाहतावर्ग तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे

Web Title: Sairat Fame Rinku Rajguru Talk About Her marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.