लहान गोष्टीतला मोठा आनंद! रिंकू राजगुरुचा व्हिडिओ पाहून नेटकरी 'आर्ची'वर पुन्हा फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:43 PM2024-04-04T15:43:43+5:302024-04-04T15:44:14+5:30

रिंकू कायम तिच्या साधेपणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

Sairat fame actress Rinku Rajguru shared cute video says enjoying little things | लहान गोष्टीतला मोठा आनंद! रिंकू राजगुरुचा व्हिडिओ पाहून नेटकरी 'आर्ची'वर पुन्हा फिदा

लहान गोष्टीतला मोठा आनंद! रिंकू राजगुरुचा व्हिडिओ पाहून नेटकरी 'आर्ची'वर पुन्हा फिदा

'सैराट' सिनेमा येऊन आता ८ वर्ष झाली आहेत. मात्र तरी सिनेमातील आर्ची परश्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. पहिल्याच सिनेमाने त्यांना आयुष्यभराची ओळखच दिली. आज दोघंही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत आहेत. पण त्यांची सैराट ची ओळख काही मिटलेली नाही. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुची (Rinku Rajguru) तर सोशल मीडियावरही खूप हवा आहे. तिने पोस्ट केलेले फोटो असो किंवा व्हिडिओ चाहत्यांच्या मनात घर करतात. रिंकू कायम तिच्या साधेपणाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

रिंकू राजगुरुने नुकताच इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये ती खूप खूश असून हिरव्यागार लॉनवर छान बागडताना दिसत आहे. शॉर्ट हेअरकट तर तिला शोभून दिसतोय. तसंच पांढरा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड स्कर्टमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलंय. त्यात चेहऱ्यावरचं सुंदर हसू तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. तिचा हा लक्ष वेधणारा व्हिडिओ पाहून नेटकरीही फिदा झालेत. 'छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद घ्या' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

रिंकू राजगुरु नुकतीच 'झिम्मा 2' मध्ये दिसली. या सिनेमात ती निर्मिती सावंतची सून होती. रिंकूने याही सिनेमात आपल्या खास अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तसंच निर्मिती सावंत यांच्यासोबत तिची कॉमेडी पाहून धमाल आली. याशिवाय रिंकूने हिंदी सिनेमा, वेबसीरिजही केल्या आहेत. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Sairat fame actress Rinku Rajguru shared cute video says enjoying little things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.