सई ताम्हणकरला लागली लॉटरी! 'भक्षक'नंतर आता आणखी दोन बॉलिवूड सिनेमात लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:02 PM2024-03-27T20:02:16+5:302024-03-27T20:02:43+5:30

Saie Tamhankar : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सतत चर्चेत असते. नुकताच तिचा नेटफ्लिक्सवर भक्षक चित्रपट रिलीज झाला होता.

Sai Tamhankar got the lottery! After 'Bhaksak', She appeared in two more Bollywood movies | सई ताम्हणकरला लागली लॉटरी! 'भक्षक'नंतर आता आणखी दोन बॉलिवूड सिनेमात लागली वर्णी

सई ताम्हणकरला लागली लॉटरी! 'भक्षक'नंतर आता आणखी दोन बॉलिवूड सिनेमात लागली वर्णी

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सतत चर्चेत असते. नुकताच तिचा नेटफ्लिक्सवर भक्षक चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर आता ती 'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्येही ती झळकणार आहे. याशिवाय ती इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि प्रतिक गांधीसोबत (Pratik Gandhi) झळकणार आहे. अॅमेझॉन प्राईमवर सईचे हे दोन नवीन प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत.
  
सई ताम्हणकर एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे. २०२४ मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसणार आहे.  इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’मध्ये ती झळकणार आहे. सई इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधीसोबत कोणती भूमिका साकारणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. सई ताम्हणकर हिच्या 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या दोन्ही आगामी प्रोजेक्टच्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेटमधून करण्यात आली असून सई या दोन्ही प्रोजेक्ट्सचा भाग बनली आहे.  या दोन्ही आगामी प्रोजेक्टबद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी सारख्या दोन दमदार कलाकारांच्या सोबतीने सई दिसणार असून तिच्यासाठी हा  क्षण खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. 

एक्सेलसोबत तीन प्रोजेक्टमध्ये झळकली सई

सई म्हणते की, एक्सेल एंटरटेनमेंटसारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एक्सेल काम करत आहे आणि म्हणून त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे. मला त्यांच्यासोबत तीनदा काम करण्याची संधी मिळाली याहून मोठी गोष्ट काय शकते ! ' डब्बा कार्टेल'सोबतीने ग्राउंड झिरो आणि अग्नी हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. 

माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती - सई

पुढे सई ताम्हणकर म्हणाली की, इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे, यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बॉलिवूडमधल्या य दोन कलाकारांच्या सोबतीने काम करणे याहून मोठे काय असणार आहे.

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल'मध्ये दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर डब्बा कार्टेल रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: Sai Tamhankar got the lottery! After 'Bhaksak', She appeared in two more Bollywood movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.