कास्टिंग काउचमध्ये सई ताम्हणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 14:50 IST2016-07-24T09:20:13+5:302016-07-24T14:50:13+5:30
अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक सारंग साठे, पॉला मॅग्लेन आणि अनुषा नंदकुमार यांनी एकत्र येऊन सुरू केलेली संस्था म्हणजे भारतीय ...
.jpg)
कास्टिंग काउचमध्ये सई ताम्हणकर
अ िनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक सारंग साठे, पॉला मॅग्लेन आणि अनुषा नंदकुमार यांनी एकत्र येऊन सुरू केलेली संस्था म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी.या पार्टीच्या अंतर्गत या युटयुब चॅनेलची कास्टिंग काउच विथ अमेय अॅण्ड निपुण ही वेब सिरीज सुरू करण्यात आली. या वेबसीरीजला खूप कमी कालावधीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण या वेबसीरीजमध्ये राधिका आपटे, प्रिया बापट, सखी गोखले, श्रिया पिळगावकर, रिमा लागू, स्वानंदी टिकेकर, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. आता, तर थेट या वेबसीरीजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सर्वाची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर येणार आहे. यामुळे या वेबसीरीजमध्ये अमेय आणि निपुण सईची कशी परीक्षा घेणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर सईदेखील या एपिसोडसाठी उत्सुक असलेली दिसत आहे. कारण सईच्या टीमने नुकतेच सोशलमिडीयावर अपडेट केले आहे की, ताई माई अक्का सगळ्यांना बसेल आता सुखद धक्का! टिक टिक वाजणार डोक्यात धड धड वाढणार ठोक्यात लवकरच! चला, तर थोडी वाट पाहूयात सई काय धुमाकूळ घालते कास्टिंग काउंचमध्ये.