सई ताम्हणकर बनली स्वच्छता दूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:53 IST2017-01-05T17:42:19+5:302017-01-05T17:53:13+5:30
कलाकारांना फॉलो करणारे त्यांचे अनेक चाहते, कलाकार वागतील तसेच करण्याच्या प्रयत्नात असतात. मग याचाच फायदा घेऊन कलाकारांना एखादया चांगल्या ...

सई ताम्हणकर बनली स्वच्छता दूत
क ाकारांना फॉलो करणारे त्यांचे अनेक चाहते, कलाकार वागतील तसेच करण्याच्या प्रयत्नात असतात. मग याचाच फायदा घेऊन कलाकारांना एखादया चांगल्या मोहिमेचे ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर केले जाते. आता हेच पाहा ना आपली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील सांगली महानगरपालिकेची स्वच्छता दूत झाली आहे. सई मुळची सांगलीचीच असल्याने तिने या गोष्टीसाठी लगेचच होकार दिला असावा. आता सई सांगलीकरांना स्वच्छतेचे धडे देताना दिसणार आहे. हागणदारीबाबत आजही सांगावे लागते हे आश्चर्य असल्याचे मत सांगली महापालिकेची स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर सई ताम्हणकरने व्यक्त करत सांगलीकरांना सुनावले आहे. मी स्वच्छता सैनिक म्हणून तुमच्याबरोबर आहे, अशी ग्वाही देखील सई ताम्हणकरने बुधवारी सांगलीमध्ये दिली. सईच्या उपस्थितीमध्ये सांगलीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी ती बोलत होती. सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी सांगलीच्या या सुकन्येने म्हणजेच सई ताम्हणकरने हातात खराटा घेत स्वच्छतेचा संदेश दिला आहे. सांगली महापालिकेने सई ताम्हणकर हिची पालिकेची स्वच्छतादूत म्हणून काही दिवसांपुर्वीच निवड केली आहे. या निवडीनंतर सईने हागणदारी मुक्त आणि स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सांगलीवाडी येथे हे स्वच्छता अभियान राबवत सईने सांगलीवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला तर यानिमित्ताने बोलताना सईने आजही हागणदारीबाबत सांगावे लागते याबाबत आश्चर्य व्यक्त करत सांगलीकरांना कानपिचक्या दिल्या. त्याचबरोबर सईने सांगलीची असल्याने मी सांगलीसाठी यापुढे भरपूर वेळ देईन, असेही कबुल केले. आता सईच्या पावलावर पाऊल ठेऊन तिचे सांगलीकर चाहते हगणदारीमुक्त गाव करतात का हे तर आपल्याला लवकरच समजेल.