या अनोख्या गौरव सोहळ्यात सई ताम्हणकरने लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 13:25 IST2017-04-11T07:55:56+5:302017-04-11T13:25:56+5:30

प्रेक्षक म्हणून मराठी सिनेसृष्टीतील सर्व स्टार स्टडेड आणि ग्लॅमरस इव्हेंट्सची व पुरस्कार सोहळ्यांची आपणा सर्वांना माहिती असते. पण मराठी ...

Sai Tamhankar attended the unique celebration | या अनोख्या गौरव सोहळ्यात सई ताम्हणकरने लावली उपस्थिती

या अनोख्या गौरव सोहळ्यात सई ताम्हणकरने लावली उपस्थिती

रेक्षक म्हणून मराठी सिनेसृष्टीतील सर्व स्टार स्टडेड आणि ग्लॅमरस इव्हेंट्सची व पुरस्कार सोहळ्यांची आपणा सर्वांना माहिती असते. पण मराठी कलाकार काही अशा इव्हेंट्समध्ये देखील सहभागी होतात जे खरं कौतुकास्पद आहे. नुकतंच अभिनेत्री सई ताम्हणकरने अशाच एका सोहळ्यात उपस्थिती लावली होती. बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजने स्पंदन २०१७ या त्यांच्या वार्षिक फेस्टिवलमध्ये ब्रेव्हहार्ट्स २०१७ असा एक उपक्रम राबवला  होता. या उपक्रमात सर्व्हिस डॉग्सचा गौरव करण्यात आला .CISF, BDDS, NDRF, एअरपोर्ट कस्टम, अॅनिमल एन्जल थेरपी डॉग्स अशा जवळजवळ १८ विविध डिपार्टमेंट्स मधील ३० डॉग्स या सोहळ्यात होते.सईचा मुळात या मुक्या प्राण्यांवर खूप जीव आहे त्यामुळे तिने या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी  लगेचच होकार दिला. सई तिच्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याबद्दल आपला अनुभव सांगताना म्हणते, मी अनुभवलेल्या पुरस्कार सोहळ्यांपैकी हा पुरस्कार सोहळा सर्वात अनोखा होता हे म्हणणं अगदी योग्य ठरेल. मी तिकडे सॅम,डॉन,रेक्स,बिंगो या सर्व्हिस डॉग्सना भेटली. मला त्यांना भेटून खूप छान वाटलं.दुनियादारी, बालकपालक, वजनदार यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नायिका बनली आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले असून एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.दिवसेंदिवस वाढणा-या लोकप्रियतेमुळे सई ताम्हणकर वेगवेगळ्या सोहळ्यात हजेरी लावत असते. तिथे तिला भेटून चाहतेही खुश होतात. मात्र सईलाही तिच्या चाहत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असल्यामुळे तिला वेगवेगळ्या सोहळ्यात उपस्थित राहायला आवडते.

Web Title: Sai Tamhankar attended the unique celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.