सई सांगते, माणसाने शरीराने वजनदार असण्यापेक्षा कर्तृत्वाने वजनदार असावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:16 IST2016-12-06T10:50:51+5:302016-12-06T12:16:55+5:30
सई ताम्हणकर सध्या भलतीच खुश आहे. कारण चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, इव्हेंटस, पुरस्कार सोहळे अशा अनेक ठिकाणी सईचा मोठ्या ...
.jpg)
सई सांगते, माणसाने शरीराने वजनदार असण्यापेक्षा कर्तृत्वाने वजनदार असावे
ई ताम्हणकर सध्या भलतीच खुश आहे. कारण चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, इव्हेंटस, पुरस्कार सोहळे अशा अनेक ठिकाणी सईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असताना दिसत आहे. नाणे तुटवडाच्या काळात देखील सईची चलती दिसत आहे. मनमोकळा स्वभाव, मदत करण्याची भावना अशा अनेक कारणांमुळे सईची डिमांड वाढत आहे. मराठी बरोबर तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे निर्माण केलेले स्थान हे कौतुकास्पद आहेच. सई पुणे येथे एका कार्यक्रमावेळी आली असता ती म्हणाली,माणसाने शरीराने वजनदार असण्यापेक्षा कर्तृत्वाने वजनदार असावे. सईच्या या वाक्याचा विचारदेखील तिचे चाहते नक्कीच करतील. तिच्या वाक्यावर प्रेक्षकांनी ही प्रतिसाद देत टाळया व शिट्टया वाजविल्या. तसेच सईला पाहण्यासाठीदेखील चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. सईचा नुकताच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रिया बापटदेखील झळकली आहे. या चित्रपटाची फारच चलती असल्याचेदेखील अदयाप पाहायला मिळते. कारण मुळातच शरीराने बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना वजनदार हा चित्रपट स्वत:बद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. स्वत:वर प्रेम करा आणि स्वत:ची काळजी घ्या हा विचार खूप परिमाणकारकपणे या चित्रपटात मांडला आहे. त्यामुळे हा चित्रपट परदेशातही हीट होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सई आणि प्रियासोबत अभिनेता चिराग पाटील, सिध्दार्थ चांदेकरदेखील दिसत आहे. अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे दाखवण्यात आलेला हा चित्रपट तेथील लोकांना खास भावला असून, लोकाग्राहस्तव अमेरिकेतील, डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस ऐन्जेलिस, कोलम्बस, हडसन आणि डल्लास या शहरांमध्ये सुद्धा शोजचे आयोजन करण्यात आले आहे.