सई ताम्हणकरने सोशलमीडियावर मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 14:27 IST2017-02-04T08:57:25+5:302017-02-04T14:27:25+5:30
आपल्या अभिनयाने अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळेच सईचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. हिचे नुकतेच ...

सई ताम्हणकरने सोशलमीडियावर मानले आभार
पल्या अभिनयाने अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळेच सईचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. हिचे नुकतेच उदाहरणदेखील समोर आले आहे. कारण सईचे इन्स्टाग्रामवर चारशे फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ती सध्या खूपच आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. सईने या सोशलमीडियावर चारशेचा टप्पा पार केल्याने आपल्या चाहत्यांचे सोशलमीडियावर आभारदेखील मानले आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनीदेखील सोशलमीडियावर तिच्या आनंदात सहभागी होऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी तर तो एक दिवस करोडोंचा टप्पा पार करेल असे म्हणत तिचे कौतुकदेखील केले आहे.
प्रत्येक कलाकारासाठी प्रेक्षक खूपच महत्वाचे असतात. कारण प्रेक्षक असतील तर शेवटी चाहते आहेत. सईने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहेत. तिचा चाहतावर्गदेखील खूप मोठा आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी, पोस्टकार्ड, सौ. शशी देवधर, पोरबाजार, गुरूपौर्णिमा, वायझेड असे अनेक चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी तिचा वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेत्री प्रिया बापटसोबत झळकली होती. या चित्रपटासाठी सईने फारच वजन वाढविले होते. त्यामुळे या चित्रपटावेळी सई आणि प्रियाची चांगलीच चर्चा रंगली होती.
मराठी चित्रपटाप्रमाणेच तिने हिंदी चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. राधिका आपटेसोबत तिने बॉलिवुड चित्रपट केला होता. हंटर असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाची खूपच चर्चा रंगली होती. या चित्रपटात सई एका हटक्या अंदाजात पाहायला मिळाली. आता तिचा आगामी चित्रपट राक्षस हादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता शरद केळकरसोबत पाहायला मिळणार आहे.