ऋतुराज गायकवाडने भावी पत्नीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, त्यावर सायली संजीव म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:49 IST2023-05-30T13:49:11+5:302023-05-30T13:49:37+5:30
Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान आता अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.

ऋतुराज गायकवाडने भावी पत्नीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, त्यावर सायली संजीव म्हणाली...
आयपीएल २०२३ (IPL)च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नईच्या रविंद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार आणि षटकार मारला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३मध्ये बाजी मारली. रविंद्र जडेजाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान आता अभिनेत्री सायली संजीव(Sayali Sanjeev) हिने कमेंट केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाड याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पाहायला मिळत आहे.
हा फोटो शेअर करत ऋतुराजने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे. ऋतुराज गायकवाडची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री सायली संजीव हिने कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सायली संजीवने ऋतुराजला आणि उत्कर्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कमेंटमध्ये म्हटले की, तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा. तसेच तिने उत्कर्षा आणि ऋतुराज या दोघांनाही टॅग केले आहे.
खरंतर सायली संजीवचं ऋतुराज गायकवाडसोबत नाव जोडले गेले होते. यावरुन सायली संजीवला गायकवाड वहिनी असं म्हटलं जायचं. मात्र यावर बोलताना सायलीनं नेहमी आमच्यात असे काहीच नाही असं म्हटलं होते. आता ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.