‘7 रोशन व्हिला’ थ्रिलरपटात सोनाली खरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 11:33 IST2016-04-01T19:13:11+5:302016-04-02T11:33:47+5:30

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सोनाली खरे हिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

'Roshan Villa' thriller Sonali true! | ‘7 रोशन व्हिला’ थ्रिलरपटात सोनाली खरे!

‘7 रोशन व्हिला’ थ्रिलरपटात सोनाली खरे!

ंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सोनाली खरे हिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ती इंडस्ट्रीचा महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखली जाते. तिने खुप लहानपणी अभिनयाच्या क्षेत्रात उडी घेतली. परिश्रम आणि ध्येयासक्ती यांच्यामुळे तिने तिचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता ती ‘7 रोशन व्हिला’ या आगामी थ्रिलरपटात दिसणार आहे. तिच्यासोबत तेजस्विनी पंडीत आणि प्रसाद ओक हे देखील दिसणार आहेत. याअगोदर तिने २००४ मध्ये ‘सावरखेड एक गाव’ या थ्रिलरपटात तिने उत्तम अभिनय साकारला आहे. यात तिचा अभिनय खुप कौतुकास्पद होता. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना थ्रिल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘7 रोशन व्हिला’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून त्याने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेतृत्व केले आहे. यात तेजस्विनी पंडीत, प्रसाद ओक, सोनाली खरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ड्रामॅटिक टिवस्ट, टर्न, उतार-चढाव यात पहावयास मिळाले आहेत. चित्रपटाचे एकंदरितच कथानक आणि प्लॉट पाहिल्यास उत्तम अभिनयाचा चित्रपट असल्याचे लक्षात येते.

">http://

Web Title: 'Roshan Villa' thriller Sonali true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.