"रॉमकॉम" चित्रपटातून झळकणार नवी जोडी, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:30 AM2019-09-30T06:30:00+5:302019-09-30T06:30:00+5:30

Rom Com Marathi Movie Teaser : हळुवार, हलकीफुलकी, नात्याचे विविध पदर उलगडणारी अशी ही प्रेमकहाणी आहे.

Rom Com Marathi Teaser | "रॉमकॉम" चित्रपटातून झळकणार नवी जोडी, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

"रॉमकॉम" चित्रपटातून झळकणार नवी जोडी, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

googlenewsNext

नावाप्रमाणेच असलेल्या 'रॉमकॉम' या चित्रपटातून एक नवी जोडी झळकणार आहे. विजय गिते आणि मधुरा वैद्य या चित्रपटात राहुल आणि सुमन या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून, या चित्रपटाचा टिझर नुकताच  सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हळुवार, हलकीफुलकी, नात्याचे विविध पदर उलगडणारी अशी ही प्रेमकहाणी आहे. 

 

 


विजयने या पूर्वी 'स्ट्रगलर्स', 'इपितर', 'दोस्तीगिरी' अशा चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तर मधुरानं 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत काम केलं होतं. त्यामुळे 'रॉमकॉम' हा मधुराचा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक फ्रेश जोडी मिळणार आहे. 
या कलाकारांसोबतच किशोर कदम,छाया कदम,अंतरा पाटील,श्वेता नाईक,स्वाती पानसरे,फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे,सिद्धेश्वरा आणि आसित रेड्डी या कलाकारांच्या भूमिका आपल्याला पहायला मिळणार असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Rom Com Marathi Teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.