रोहित राऊत ठरला मिर्ची अॅवॉर्डचा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 09:47 IST2018-03-15T04:17:30+5:302018-03-15T09:47:30+5:30

 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम, महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक, रोहित राऊत, याला नुकत्याच पार पडलेल्या रेडिओ मिर्ची  ...

Rohit Raut won the award for the Mercy Award | रोहित राऊत ठरला मिर्ची अॅवॉर्डचा मानकरी

रोहित राऊत ठरला मिर्ची अॅवॉर्डचा मानकरी

 &#
39;सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम, महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक, रोहित राऊत, याला नुकत्याच पार पडलेल्या रेडिओ मिर्ची  संगीत पुरस्कारांमध्ये, ‘बेस्ट फिल्म सॉंग ऑफ द इयर: हृदयात वाजे समथिंग’ आणि ‘बेस्ट अल्बम ऑफ द इयर: ती सध्या काय करते’ साठी तब्बल २ पुरस्कार देण्यात आले. रोहितला एकूण ३ गटात नामांकने होती, त्यापैकी २ गटात, परीक्षकांच्या बहुमतांनी, त्याने पुरस्कार पटकावले.

आनंद व्यक्त करताना रोहित म्हणतो, " हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. मला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला तो म्हणजे माझ्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी, माझ्या मित्रांनी आणि अर्थात घरच्यांनी. त्यांनी माझ्यावर केलेलं जीवापाड  प्रेम आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळेलेले पुरस्कार हे माझ्यासाठी अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन असतं व माझ्या परीने मी नक्कीच उत्तम काम करत राहीन.”

रोहितने 'सारेगमप -घे पंगा कर दंगा' या रिअॅलिटी शो चे सूत्रसंचलान देखील केले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्समधून रसिकांच्या पसंतीस उतरलेला गायक रोहित राऊतचे सूत्रसंचालन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. नचिकेत लेले या पर्वाचा विजेता ठरला होता.  'ओढ’ याचित्रपटात  ‘ना जाने क्या हुआ है’ हे अभय इनामदार यांनी लिहिलेलं गाणं रोहित राऊत आणि आनंदी जोशी यांनी गायले होते. एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावनाचे दिग्दर्शन नागेश दरक आणि एस. आर. तोवर यांनी केले आहे. तरुणाईच्या ओठावर सहज रुळतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून हा सुरेल नजराणा प्रेक्षकांनी अनुभवला.    

Web Title: Rohit Raut won the award for the Mercy Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.