रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

By कोमल खांबे | Updated: May 21, 2025 15:04 IST2025-05-21T15:03:39+5:302025-05-21T15:04:09+5:30

Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. 

ritesh deshmukh raja shivaji new poster out movie will release on 1st may 2026 | रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वीच रितेशने या सिनेमाची घोषणा केली होती. आता 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. 

रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावरुन 'राजा शिवाजी' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचं धगधगतं रूप दिसत आहे. "महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत 'राजा शिवाजी'", असं म्हणत रितेशने हे पोस्टर शेअर केलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पोस्टर पाहून चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 


'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शनही रितेशनेच केलं आहे. तर जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी स्टारकास्ट आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे. 

Web Title: ritesh deshmukh raja shivaji new poster out movie will release on 1st may 2026

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.