संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:48 IST2025-05-21T15:47:50+5:302025-05-21T15:48:31+5:30

रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे. 

ritesh deshmukh raja shivaji movie star cast sanjay dutt mahesh manjarekar abhishek bachchan genelia to play lead role | संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी

संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी

रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमात रितेश देशमुखछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशला महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे. 

'राजा शिवाजी' सिनेमाची स्टार कास्ट समोर आली आहे. या सिनेमात रितेशसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, फरदीन खान या बॉलिवूड कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमात जिनिलीयादेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 


रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावरुन 'राजा शिवाजी' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचं धगधगतं रूप दिसत आहे. "महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत 'राजा शिवाजी'", असं म्हणत रितेशने हे पोस्टर शेअर केलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पोस्टर पाहून चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 


'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शनही रितेशनेच केलं आहे. तर जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे. 
 

Web Title: ritesh deshmukh raja shivaji movie star cast sanjay dutt mahesh manjarekar abhishek bachchan genelia to play lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.