"पप्पा, ते तुम्हाला कधीच भेटले नाहीत पण...", विलासराव देशमुखांचा स्मृतिदिन, रितेशच्या वहिनीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:02 IST2025-08-14T11:01:28+5:302025-08-14T11:02:14+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. महाराष्ट्राराच्या राजकारणात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आज त्यांच्या स्मृतिदिनी देशमुख कुटुंबियांनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

"पप्पा, ते तुम्हाला कधीच भेटले नाहीत पण...", विलासराव देशमुखांचा स्मृतिदिन, रितेशच्या वहिनीची भावुक पोस्ट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. १४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासराव देशमुखांचं निधन झालं. महाराष्ट्राराच्या राजकारणात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आज त्यांच्या स्मृतिदिनी देशमुख कुटुंबियांनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रितेश देशमुखने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये रितेशची दोन्ही मुलं विलासराव देशमुखांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहेत. "आजोबा आम्ही तुम्हाला मिस करतो" असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटींनी विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी अभिवादन केलं आहे.
रितेशची वहिनी आणि बॉलिवूड निर्माती असलेल्या दीपशिखा देशमुखनेही विलासरावांच्या स्मृतिदिनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. "पप्पा, तुमची उणीव नेहमीच जाणवते. वंश व दिवियाना तुम्हाला कधी भेटले नाहीत. मात्र तरी असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी त्यांना तुमची आठवण आली नाही. धिरज, मी आणि इतर अनेकांनी तुमच्या विषयी सांगीतलेले किस्से यामधून ते तुम्हांला ओळखतात व तुमच्यावर प्रेम करतात", असं पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे.
दीपशिखा देशमुख ही धीरज देशमुख यांची पत्नी आहे. धीरज देशमुख राजकारणात सक्रिय आहेत. तर दीपशिखा बॉलिवूडमध्ये काम करते. बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीची ती बहीण आहे.