रितेशला जेनिलिया का वाटे टिनएजर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 09:29 IST2016-10-22T15:37:04+5:302016-10-23T09:29:17+5:30

अभिनेता रितेश देखमुख सध्या चांगलाच लाईमलाईटमध्ये आला आहे. चित्रपट, कार्यक्रम आणि टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोजचे सूत्रसंचालन करून तो प्रेक्षकांच्या घराघरात ...

Riteishala Genilia's Way Tinyaser? | रितेशला जेनिलिया का वाटे टिनएजर ?

रितेशला जेनिलिया का वाटे टिनएजर ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">अभिनेता रितेश देखमुख सध्या चांगलाच लाईमलाईटमध्ये आला आहे. चित्रपट, कार्यक्रम आणि टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोजचे सूत्रसंचालन करून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. एवढेच नाही तर रितेश आता फास्टर फेणे या मराठी चित्रपटाची निर्मिती त्याच्या बायकोसोबत म्हणजेच जेनेलियाला घेऊन करत आहे. नुकताच त्याने जेनेलिया सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये हे दोघेही नवरा-बायको खूपच क्युट दिसत आहेत. रितेश सध्या त्याच्या वाढलेल्या दाढीला घेऊन खूपच चर्चेत आहेत तर जेनेलिया दोन मुलांची आई असून देखील एकदम फिट आणि बबली गर्ल दिसत आहे. त्यामुळेच की काय रितेशने सांगतोय, माझी बायको एकदम टिनएजरच दिसते आहे. रितेश एवढे बोलून थांबलेला नाही. तर हा पठ्ठया स्वत:ला जेनेलियाचा बाप समजतोय. आता याला म्हणावे तरी काय ? दाढी वाढवली म्हणजे रितेश काही  म्हातारा होत नाही रे हे त्याला कोण सांगणार ? असे काय झाले की रितेश स्वत:ला जेनिलियाचा बाप म्हणतोय हे आता तोच सांगू शकेल. रितेशला काहीही वाट असले तरी या दोघांच्या जोडीला बघून प्रेक्षक नेहमीच लयभारी असचे म्हणतात यात काही शंका नाही. जेनेलिय आणि रितेशला रिआन आणि राहिल अशी दोन मुले आहेत. दोन मुलांची आई असुन देखील जेनेलिया मेंटेन असल्याचेच दिसत आहे. ती चित्रपटात जरी झळकली नसली तरी लवकरच आपल्याला एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात जेनेलिया दिसू शकते. सध्या फास्टर फेणे चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे कपल व्यस्त आहे.      

Web Title: Riteishala Genilia's Way Tinyaser?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.