रितेश देशमुखनं मनं जिंकली: 'वेड'च्या गाण्यावरचं 'ते' Reel पाहून चाहत्यांना काळजीनं म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:40 AM2022-12-14T11:40:13+5:302022-12-14T11:40:38+5:30

Riteish Deshmukh's Ved Movie : 'वेड' चित्रपटातील 'वेड तुझा...' गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या गाण्यावरील रिल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Riteish Deshmukh won hearts: After seeing the reel of 'Ved' song, he worriedly told fans... | रितेश देशमुखनं मनं जिंकली: 'वेड'च्या गाण्यावरचं 'ते' Reel पाहून चाहत्यांना काळजीनं म्हणाला...

रितेश देशमुखनं मनं जिंकली: 'वेड'च्या गाण्यावरचं 'ते' Reel पाहून चाहत्यांना काळजीनं म्हणाला...

googlenewsNext

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)ने रसिकांच्या मनात घर केले आहे. रितेश देशमुख बऱ्याचदा त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असतो. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे तेही त्याचा आगामी मराठी चित्रपट 'वेड' (Ved Movie)मुळे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटातील वेड तुझा हे गाणंदेखील रसिकांच्या भेटीला आले आहे आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर रिल पाहायला मिळत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याचं 'वेड तुझा' गाण्यावरील रिल पाहून छान वाटले पण त्याला त्यांची जास्त काळजी वाटली. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर त्याच्या सर्व चाहत्यांना आवाहन केले आहे.

रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील वेड तुझा गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या गाण्यावरील रिल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान एका नेटकऱ्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. कारण त्याच्या रिलची दखल घेत रितेशने चिंता व्यक्त केली आहे. रितेश देशमुखने वेड तुझा गाण्यावरील एका नेटकऱ्याच्या रिलचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, मोटर सायकलवर बसताना कृपया हेल्मेट घाला आणि कृपया फोन असा वापरू नका. अपघात होऊ शकतो. भरपूर प्रेम. रितेश 

खरेतर या व्हिडीओत नेटकरी बाईक चालवतो आहे. मागे त्याची पत्नी बसलेली आहे. एका हातात मोबाईलनं तो व्हिडीओ शूट करतो आहे. असे गाडी चालवताना व्हिडीओ शूट करणं जीवावर बेतू शकते. त्यामुळे रितेशने सोशल मीडियावर चाहत्यांना आवाहन केले आहे.


'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. वेड मधून रितेशने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे तर जेनेलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहे.

Web Title: Riteish Deshmukh won hearts: After seeing the reel of 'Ved' song, he worriedly told fans...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.