रिंकू राजगुरुच्या व्हिडीओतील अदा पाहून चाहते झाले फिदा, दिसली स्टायलिश लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:23 IST2021-01-30T17:18:21+5:302021-01-30T17:23:04+5:30
रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

रिंकू राजगुरुच्या व्हिडीओतील अदा पाहून चाहते झाले फिदा, दिसली स्टायलिश लूकमध्ये
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने पांढरा टी-शर्ट, ब्लॅक रंगाची शॉर्ट्स आणि कमरेला शर्ट बांधला आहे. एका गाण्याच्या म्युझिकवर रिंकू थिरकताना दिसतेय. या व्हिडीओतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.
या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.