रिंकू राजगुरूची अदाच न्यारी, बंजारा आऊटफिटमुळे खुलून आलंय सौंदर्य, पाहा हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:06 IST2021-02-22T13:05:54+5:302021-02-22T13:06:42+5:30

रिंकूने बंजारा ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले असून या ड्रेसला साजेशे तिने दागिने देखील घातले आहेत. हा ड्रेस खास तिच्यासाठी बनवण्यात आलेला आहे.

rinku rajguru shares picture in banjara outfit | रिंकू राजगुरूची अदाच न्यारी, बंजारा आऊटफिटमुळे खुलून आलंय सौंदर्य, पाहा हा फोटो

रिंकू राजगुरूची अदाच न्यारी, बंजारा आऊटफिटमुळे खुलून आलंय सौंदर्य, पाहा हा फोटो

ठळक मुद्देरिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून एक तासांत 19 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील रिंकूचा अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.

रिंकूने बंजारा ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले असून या ड्रेसला साजेशे तिने दागिने देखील घातले आहेत. हा ड्रेस खास तिच्यासाठी बनवण्यात आलेला आहे. रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून एक तासांत 19 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. 

रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. तसेच ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली असून दररोज एक तरी फोटो ती पोस्ट करत आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: rinku rajguru shares picture in banjara outfit