रिंकू राजगुरू दिवसेंदिवस दिसायला लागलीय अधिकच सुंदर, हा व्हिडिओ पाहून म्हणाल व्वा क्या बात है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 13:05 IST2021-02-20T13:03:36+5:302021-02-20T13:05:53+5:30

रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिंकूचा अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.

rinku rajguru looking good in maharashtrian attire | रिंकू राजगुरू दिवसेंदिवस दिसायला लागलीय अधिकच सुंदर, हा व्हिडिओ पाहून म्हणाल व्वा क्या बात है

रिंकू राजगुरू दिवसेंदिवस दिसायला लागलीय अधिकच सुंदर, हा व्हिडिओ पाहून म्हणाल व्वा क्या बात है

ठळक मुद्देया व्हिडिओत रिंकूने खणाची साडी घातली असून त्यावर साजेशे दागिने घातले आहेत. तसेच केसाचा अंबाडा घातला असून मोठाले गुलाबाचे फुल माळले आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिंकूचा अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.

या व्हिडिओत रिंकूने खणाची साडी घातली असून त्यावर साजेशे दागिने घातले आहेत. तसेच केसाचा अंबाडा घातला असून मोठाले गुलाबाचे फुल माळले आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, हातात काचेच्या बांगड्या या सगळ्यामुळे रिंकूचे सौंदर्य आणखीन फुलून आले आहे. या व्हिडिओत ऐरणीच्या देवा तुला हे गाणे आपल्याला ऐकायला मिळत असून या व्हिडिओसोबत जुने ते सोनं अशी कॅप्शन तिने दिली आहे. 

रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन तासांत 19 हजाराहून लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर तिचे फॅन्स कमेंटद्वारे ती खूपच सुंदर दिसत असल्याचे तिला सांगत आहेत. 

रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: rinku rajguru looking good in maharashtrian attire