क्रांती कोणत्या ‘क्वीन’ रोलच्या प्रतिक्षेत आहे..जाणून घ्या आमच्यासोबत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 14:24 IST2016-12-12T14:24:12+5:302016-12-12T14:24:12+5:30

गीतांजली आंब्रे  ‘कोंबडी पळाली’ या गाण्यातील जिच्या दिलखेचक नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला, ती क्रांती रेडकर लवकरच ‘करार’ या ...

The revolution is waiting for the 'queen' rolls..Know us. | क्रांती कोणत्या ‘क्वीन’ रोलच्या प्रतिक्षेत आहे..जाणून घ्या आमच्यासोबत..

क्रांती कोणत्या ‘क्वीन’ रोलच्या प्रतिक्षेत आहे..जाणून घ्या आमच्यासोबत..

ong>गीतांजली आंब्रे 

‘कोंबडी पळाली’ या गाण्यातील जिच्या दिलखेचक नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला, ती क्रांती रेडकर लवकरच ‘करार’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘शहाणपण देगा देवा’ , ‘आॅन ड्युटी २४ तास’, ‘जत्रा’, ‘फक्त लढ म्हणा’ ‘नो एट्री पुढे धोका आहे’, अशा अनेक या चित्रपटांतून क्रांतीने आपल्या अभिनयाची छाप सोडली. केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन क्षेत्रातही ती उतरली.‘काकण’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने दिग्दर्शनात पदार्पण केले. आता क्रांती ‘करार’मध्ये एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सशी तिने मारलेल्या दिलखुलास गप्पा...

दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारचे करार करत असतो ? मात्र सिनेमात तू कसला ‘करार’ करणार आहेस ?
खरे तर आताश: आपले अख्खे आयुष्य बिझनेस ओरिएंटेड झाले आहे. स्वत:साठी वेळ नाही, मुलांसाठी वेळ नाही,अशा  प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्धवणाºया समस्या आणि त्यांचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून  मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माणूस आपल्या भावना आणि मूल्ये विसरत चालला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातही चांगल्या गोष्टींचा ‘करार’ करायला हवा, आयुष्याचे गमक सांगणारा हा सिनेमा आहे. 

या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे ?
 या चित्रपटातला नायक म्हणजेच सुबोध हा कंजूष नसतो पण प्रचंड हिशेबी असतो. तो आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी करार करतो. या जोडप्याला मुलं होत नसतं. मग ते सरोगेट मदरची मदत घेतात. त्या सरोगेट मदरची भूमिका मी  साकारते आहे. त्या सरोगेट मदरशी चित्रपटातला नायक कशा पद्धतीचा ‘करार’ करतो याभोवती चित्रपटाची कथा फिरते.  

तू अभिनेत्री आहेस. ‘काकण’या चित्रपटाच्या माध्यमातून  तू दिग्दर्शन क्षेत्रातदेखील पदार्पण केले आहेस. क्रांती आता निर्मिती क्षेत्रातही उतरणार का ? 
हो नक्कीच उतरायला आवडले. ‘काकण’ हा चित्रपटाची निर्मिती करणार  प्रॉडक्शन हाऊस हे आमचचं आहे. त्यामुळे निर्माती म्हणून स्वत:ला सिद्ध करायला नक्कीच आवडेल.  हळूहळू मला टेलिव्हिजन शोच्या निर्मितीत उतरायलादेखील नक्की आवडले.

तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील ?
‘करार’नंतर माझे दोन सिनेमे येत आहेत. त्यापैकी एक चित्रपट आहे 'ट्रकभर स्वप्न' जो नितीन देसाईंचा चित्रपट आहे. तर दुसरा चित्रपट आहे ‘बाळा’. यात उपेंद्र लिमये, विक्रम गोखले, सुहासिनी मुळे अशी तगडी स्टारकास्ट आहे.  

बºयाच अभिनेत्री छोट्या पडद्यावर दिसतायेत. क्रांती आम्हाला छोट्या पडद्यावर कधी पहायला मिळेल ? 
मला आवडेल अशी, मला साजेशी अशी भूमिका करायला मला नक्कीच आवडेल. ज्या भूमिकेत  क्रांती फिट बसते अशी भूमिका चालून येत असेल तर मी छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे.  छोट्या पडद्यावर काम करण्यास माझा अजिबात विरोध नाही. उलट याठिकाणी काम करायला मला नक्कीच आवडेल. अर्थात सहा महिन्यांची किंवा लिमिटेड एपिसोडची मालिका करायला मला जास्त आवडेल. कारण चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढणे तसे कठीण आहे.  त्यामुळे मला कमी कालावधीत संपणारी मालिका करायला आवडतील. 

तुझा ड्रीम रोल कोणता ?
ड्रीम रोल असे काहीही मी अद्याप ठरवलेले नाही. माझ्यातील कलाकाराला आव्हान देणारी भूमिका करायला मला आवडत.  मला वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला आवडते. अशा धाटणीच्या किंवा फिजिक्लि चॅलेंज देणाºया भूमिका करायला मला अधिक आवडेल. मला कॉमेडी करायला खूप आवडते. त्यामुळे माझ्यासाठी एखादी विनोदी भूमिका  लिहिली गेली तर ती करायला मला नक्कीच आवडेल.  कंगनाने ‘क्वीन’मध्ये जी भूमिका साकरली ती लाईफ टाईम होती तशी एखादी भूमिका मला नक्कीच करायला आवडेल.

Web Title: The revolution is waiting for the 'queen' rolls..Know us.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.