क्रांती रेडकर करणार सकारात्मक पध्दतीने जीवन जगण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 12:49 IST2016-12-31T12:49:21+5:302016-12-31T12:49:21+5:30

 प्रत्येकजण नवीन संकल्प करत असतात. मात्र आपले लाडक्या कलाकारांचा नवीन संकल्प काय असणार आहे याकडे प्रत्येक चाहत्याचे लक्ष असते. ...

Revolution Redakkar tried to live a positive way | क्रांती रेडकर करणार सकारात्मक पध्दतीने जीवन जगण्याचा प्रयत्न

क्रांती रेडकर करणार सकारात्मक पध्दतीने जीवन जगण्याचा प्रयत्न

 
्रत्येकजण नवीन संकल्प करत असतात. मात्र आपले लाडक्या कलाकारांचा नवीन संकल्प काय असणार आहे याकडे प्रत्येक चाहत्याचे लक्ष असते. त्यामुळे क्रांती रेडकरच्या चाहत्यांसाठी तिचा नवीन वर्षाचा संकल्प जाणवून घेतला आहे. क्रांती सांगते, यंदा मी पूर्ण सकारात्मक पध्दतीने जगण्याचा संकल्प केला आहे. मनातील नकारात्मक पध्दतीची भिती दूर करून सकारात्मक पध्दतीने विचार करणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासदेखील वाव मिळतो. त्याचप्रमाणे माझे काम आणि खासगी आयुष्य यामध्ये एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करणार आहे. चालू वर्षी कामाच्या ओघात माझे शेडयुल्ड खूप विस्कळीत झाले होते. त्यामुळे आगामी वर्षात या सर्व गोष्टींची मी पुरेपूर काळजी घेण्याचे ठरले आहे. तसेच नेहमीच्या त्याच त्याच भूमिकेच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका करण्याचा विचार मी नवीन वर्षासाठी केला आहे. मुळात त्यासाठी मी माझे प्रयत्न देखील सुरु केले आहेत. क्रांतीचा नवीन वर्षात करार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ती खूपच आनंदित आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि सुबोध भावेदेखील झळकणार आहे. हा चित्रपट मनोज कोटियान दिग्दर्शन केला आहे. आयुष्यात कशी वेळ येऊ शकते? कसा गुंता निर्माण होऊ शकतो? या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या धाटणीचा करार हा चित्रपट प्रेक्षकांना १३ जानेवारीला भेटीला येणार आहे. क्रॅक एंटरटेनमेंटच्या पूनम सिव्या यांची पहिलीच निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. तसेच ट्रकभर स्वप्न हा माझा दुसरा चित्रपटदेखील नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. या माज्या दोन चित्रपटातील माज्या भूमिका या खूप वेगळ्या आहेत. चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडण्याचा माझा हा मानस आगामी वर्षात पूर्ण करेन. तसेच निर्मितीक्षेत्रातही विशेष काहीतरी करण्याची इच्छा असल्याचे क्रांतीने सांगितले. 
             



Web Title: Revolution Redakkar tried to live a positive way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.