पुन्हा जुळणार रेशीमगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 12:29 IST2016-11-23T12:29:59+5:302016-11-23T12:29:59+5:30

जुळुन येतील रेशीमगाठी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच या मालिकेतील ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोडीदेखील ...

Repeat silk | पुन्हा जुळणार रेशीमगाठी

पुन्हा जुळणार रेशीमगाठी

ळुन येतील रेशीमगाठी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच या मालिकेतील ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हीट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. प्रेक्षकांच्या ही उत्सुकता खरचं प्रत्यक्षात उतरणार असल्याचे समजत आहे. हो, खरचं ललित आणि प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी आता पुन्हा एकदा एकत्रित पाहायला मिळणार आहे. हो ही जोडी आता एकत्रित चित्रपटात झळकणार असल्याचे समजत आहे. त्यांची ही जोडी दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या चित्रपटात झळकणार असल्याचे कळत आहे. हे दोघे नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अजूनदेखील गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे चित्रिकरण मात्र अजून सुरू झाले नाही. पण या कलाकारांकडून दुजोरा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेतील ही जोडी पुन्हा रूपरी पडदयावर झळकणार असल्याने त्यांचे चाहते नक्कीच आनंदी झाले असणार आहे. जुळुन येतील रेशीमगाठी या मालिकेनंतर या जोडीची गाडी सुसाट निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अभिनेता ललित प्रभाकर हा अभिनेत्री नेहा महाजनसोबतदेखील झळकणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव टीटीएमएम असे आहे. त्यांची ही हटके जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील वाट पाहत आहेत. तसेच अभिनेता सुव्रत जोशीसोबतदेखील प्राजक्ता माळीसोबत आणखी एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुव्रत हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने सुजयची भूमिका साकारली होती. म्हणजेच प्रेक्षकांना आता, छोटया पडदयावरचे आपले लाडके कलाकार रूपेरी पडदयावर झळकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हे नक्कीच एक खास सरप्राईज असणार आहे. 

Web Title: Repeat silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.