रेणुका-आशुतोष एकाच फ्रेममध्ये

By Admin | Updated: September 8, 2016 03:25 IST2016-09-08T03:25:58+5:302016-09-08T03:25:58+5:30

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल म्हटले की, ते आपल्याला कार्यक्रम, पार्टी, पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळतात

Renuka-Ashutosh in the same frame | रेणुका-आशुतोष एकाच फ्रेममध्ये

रेणुका-आशुतोष एकाच फ्रेममध्ये

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलीवूडमधील कपल इतर बॉलीवूड कपल्सपेक्षा खूपच वेगळे आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल म्हटले की, ते आपल्याला कार्यक्रम, पार्टी, पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळतात, पण रेणुका-आशुतोष खूपच कमी वेळा एकत्र दिसतात, परंतु नुकतेच हे दोघे एकाच फ्रेममध्ये झळकले आहे. पारंपरिक वेशभूषेत रेणुका आणि आशुतोष एकदमच झक्कास दिसत आहेत. या फोटोबाबत रेणुका सांगते, ‘खरे तर एका मित्राच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी मी आणि राणाजी गेलो होतो. त्या मित्राची बायको खूपच सुंदर वारली पेंटिंग काढते. तिने तिच्या घराच्या भिंतींवरही वारली चित्रे काढली आहेत. त्या भिंतीजवळ बसून आम्ही दोघांनी फोटो काढलाय. राणाजींना ते पेंटिंग खूपच आवडल्याने आम्ही त्या ठिकाणी हा सुंदर क्षण कॅमेरात बंदिस्त केला.’ आशुतोषसोबत काम करण्याची इच्छा असल्याचेदेखील रेणुकाने सांगितले, परंतु चांगली कथा मिळाली नसल्याने आम्ही दोघे अजून तरी चित्रपटात एकत्र आलो नाही, असे ती सांगते.

Web Title: Renuka-Ashutosh in the same frame