Ravindra Mahajani : 'तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेलीय...', सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:30 AM2023-07-15T10:30:22+5:302023-07-15T10:30:58+5:30

Ravindra Mahajani : मराठी सिनेइंडस्ट्रीतील हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांचे १४ जुलै रोजी निधन झाले.

Ravindra Mahajani : 'Your image is etched in my mind forever...', Subodh Bhave pays tribute to Ravindra Mahajani | Ravindra Mahajani : 'तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेलीय...', सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली

Ravindra Mahajani : 'तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेलीय...', सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता सुबोध भावे (Subodh Bhave) याने इंस्टाग्रामवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुबोध भावेने रवींद्र महाजनी यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या " सत्तेसाठी काहीही " या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील हॅण्डसम नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

वर्कफ्रंट...
मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून रवींद्र महाजनी यांनी कलाविश्वात पदार्पण केले. त्यानंतर १९७४ साली झुंज या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली.  हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा हॅण्डसम हंक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’,  ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. १९९० नंतर  चरित्र भूमिका, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रवेश केला. २०१५ नंतर रवींद्र महाजनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांत झळकले.

Web Title: Ravindra Mahajani : 'Your image is etched in my mind forever...', Subodh Bhave pays tribute to Ravindra Mahajani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.