रवीने केला लोगो डिझाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:41 IST2016-10-14T10:12:50+5:302016-10-15T18:41:57+5:30
दिग्दर्शक रवी जाधवने एक लोगो डिझाईन केला आहे. आता तुम्ही म्हणाल की रवीने कसला, आणि ...
.jpg)
रवीने केला लोगो डिझाईन
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
दिग्दर्शक रवी जाधवने एक लोगो डिझाईन केला आहे. आता तुम्ही म्हणाल की रवीने कसला, आणि कशासाठी लोगो तयार केलाय. तर जरा थांबा, रवीने लोगो डिझाईन केला आहे तो, संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्यासाठी. हा लोगो रवीने नुकताच सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या बद्दल रवी ट्वीट करून सांगतोय की, अजय-अतुल यांच्या मोरया या प्रोडक्शन हाऊससाठी हा खास लोगो तयार केला आहे. या लोगोमध्ये 'ए' हे अक्षर लाल रंगामध्ये दिसत असुन त्याला गणपतीचा आकार देण्यात आला आहे. अजय-अतुल हे गणपतीचे भक्त असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील मोरया आहे. त्यामुळेच रवीने अशा प्रकारचा लोगो तयार केला असावा. रवी जाधव दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, आता तो आपल्याला अभिनय ही करताना दिसणार आहे. परंतु तो एक उत्तम लोगो डिझायनरही असल्याचे आता समोर आले आहे.
Logo designed by me for my dear brothers 'AJAY-ATUL' for their production house.
Morya!!! pic.twitter.com/ENdspBPcTI— Ravi Jadhav (@meranamravi) October 12, 2016