मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 02:07 PM2023-03-18T14:07:17+5:302023-03-18T14:08:07+5:30

Rasmika Mandanna : मराठमोळ्या गाण्यांवर पुष्पाची श्रीवल्ली डान्स करणार आहे.

Rashmika Mandanna's open romance with Marathmola 'Pushpa'!, the video is going viral | मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा ब्लॉकबस्टर सिनेमा 'पुष्पा'(Pushpa Movie)ने प्रेक्षकांना वेड लावले. पुष्पातील श्रीवल्लीने रसिकांना वेड लावले. श्रीवल्लीने फक्त अभिनयच नाही तर आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ केले आहे. आता हीच श्रीवल्ली मराठमोळ्या रंगमंचावर अवतरणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पहिल्यांदा मराठी कार्यक्रमात झळकणार आहे. झी चित्र गौरव पुरस्कार 2023 मध्ये रश्मिका मंदाना थिरकताना दिसणार आहे. मराठमोळ्या गाण्यांवर पुष्पाची श्रीवल्ली डान्स करणार आहे.

श्रीवल्लीला मराठी कार्यक्रमात पाहून मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेने देखील तिच्याबरोबर रोमान्स करण्याची संधी सोडली नाही. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे. श्रीवल्लीची एन्ट्री होताच श्रेयस रश्मिकावर फिदा झाला. मग रश्मिकाने देखील खुलेआम त्याच्यासोबत रोमान्स केला.


अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये पुष्पाराजच्या आवाजाचं संपूर्ण डबिंग केले आहे. श्रेयसचे हे काम प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आणि पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजा क्या फायर हैं में फायर हा डायलॉग सुपरहिट झाला.

झी चित्र गौरवच्या मंचावर अभिनेत्री रश्मिका मंदानाची एंट्री होताच श्रेयस पुष्पामधील त्याचे दमदार डायलॉग बोलताना दिसला. पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या... हा जबरदस्त डायलॉग बोलत श्रेयसने रश्मिकाला फ्लाइंग किस केले. त्यावर रश्मिका देखील लाजत लाजत श्रेयसला डोळा मारून फ्लाइंग किस करताना दिसली. येत्या 26 मार्चला संध्याकाळी 7 वाजता झी चित्र गौरव प्रसारीत होणार आहे. 

Web Title: Rashmika Mandanna's open romance with Marathmola 'Pushpa'!, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.