'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं थिएटर हाऊसफूल! मराठी अभिनेता व्हिडिओ शेअर करत म्हणाला- वो कायर क्या जाने...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 08:54 AM2024-04-01T08:54:12+5:302024-04-01T08:56:03+5:30

Swatantryaveer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट, रणदीप हुड्डाचंही केलं कौतुक

randeep hooda swatantryaveer savarkar movie show housefull marathi actor sunil barve shared video | 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं थिएटर हाऊसफूल! मराठी अभिनेता व्हिडिओ शेअर करत म्हणाला- वो कायर क्या जाने...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं थिएटर हाऊसफूल! मराठी अभिनेता व्हिडिओ शेअर करत म्हणाला- वो कायर क्या जाने...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. तर अंकिता लोखंडेने या सिनेमात वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी अभिनेतासुनील बर्वे यांनी देखील याबाबत पोस्ट लिहिली आहे.

सुनील बर्वे यांनी नुकतंच सिनेमागृहात जाऊन 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिला. थिएटरमधील व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओत थिएटर हाऊसफूल दिसत आहे. ते म्हणतात, "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!! अभिनंदन रणदीप हुडा, ह्या थोर स्वातंतत्र्यवीराचं चरित्र चित्रपटाच्या माध्यमामातून जगासमोर आणल्याबद्दल!! सावरकरांबद्दल इतक्या समर्पित भावनेनं चित्रपट करण्यासाठी कलेजा लागतो, जो फक्त आमच्या बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके आणि तुमच्याकडे आहे!! आणि त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करीत आहेत हे पाहून खूप आनंद झाला!!". 

याआधीही अनेक मराठी कलाकारांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. सौरभ गोखले, शरद पोंक्षे, प्रसाद ओक, सुबोध भावे, राहुल देशपांडे, राधिका देशपांडे या कलाकारांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं कौतुक केलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. हिंदी बरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: randeep hooda swatantryaveer savarkar movie show housefull marathi actor sunil barve shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.