'इपितर' सिनेमाच्या टीमने घेतली राज ठाकरे यांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 20:30 IST2018-07-09T15:53:00+5:302018-07-09T20:30:00+5:30
परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे येत्या 13 जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे

'इपितर' सिनेमाच्या टीमने घेतली राज ठाकरे यांची भेट!
परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे येत्या 13 जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ह्या सिनेमाच्या टीमने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांची भेट घेतली.
सिनेमाचे निर्माते किरण बेरड ह्याविषयी म्हणाले, “राज ठाकरे ह्यांचा सामाजिक क्षेत्रात जसा वावर असतो, तेवढाच कलाक्षेत्रातही त्यांचा वावर असतो. त्यांना कलेची उत्तम जाण आहे. त्यामूळे त्यांना आमच्या सिनेमाचे पोस्टर भेट द्यावे अशी इच्छा होती. त्यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी आमच्या सिनेमाविषयी आत्मियतेने चर्चा केली.”
डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती किरण बेरड आणि नितीन कल्हापुरे ह्यांनी केली आहे. सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे ह्यांची सहनिर्मिती असलेल्या इपितर ह्या विनोदी सिनेमाचे लेखन किरण बेरड ह्यांनी केले असून दिग्दर्शन दत्ता तारडे ह्यांनी केले आहे. भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला इपितर हा सिनेमा 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड सिनेमाविषयी सांगतात, “इपितर हा टिपीकल गावाकडला शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो.अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हांला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केलेला आहे.”