राज अन् शर्मिला ठाकरे यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणाल्या, 'दोघंही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:39 PM2023-06-21T15:39:26+5:302023-06-21T15:41:30+5:30

राज ठाकरे आणि शर्मिला हे एकमेकांना प्रेमपत्र पाठवण्यासाठी चक्क एका मराठी अभिनेत्रीची मदत घ्यायचे.

Raj Thackeray and Sharmila used to take the help of a Marathi actress vandana gupte to send love letters to each other | राज अन् शर्मिला ठाकरे यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणाल्या, 'दोघंही...'

राज अन् शर्मिला ठाकरे यांच्यातील प्रेमाचा दुवा होती 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणाल्या, 'दोघंही...'

googlenewsNext

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांची लव्हस्टोरी आपण ऐकली असेलच. राज ठाकरे यांची बहीण आणि शर्मिला ठाकरे या एकमेकींच्या खास मैत्रिणी होत्या. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांचं राज ठाकरेंच्या घरी येणं जाणं होतंच. तेव्हाच दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुलू लागलं होतं. त्यावेळी एकमेकांना सहसा प्रेमपत्र पाठवले जायचे. तर राज ठाकरे आणि शर्मिला हे एकमेकांना प्रेमपत्र पाठवण्यासाठी चक्क एका मराठी अभिनेत्रीची मदत घ्यायचे. स्वत: त्या अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे.

कोण आहे ती अभिनेत्री?

शर्मिला ठाकरे या नाट्यकलावंत मोहन वाघ यांच्या कन्या. राज ठाकरे यांना आधीपासूनच कलेची आवड होतीच. राज ठाकरे आणि शर्मिला यांची घरं दादरमध्येच. तसंच मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं घरही दादरमध्येच होतं. वंदना गुप्ते आणि शर्मिला ठाकरे दोघीही एकमेकींच्या मैत्रिणी. मोहन वाघ यांच्या कित्येक नाटकात  वंदना गुप्ते यांनी काम केलंय. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते म्हणाल्या, 'मी त्यांची प्रेमपत्र पोहोचवायचे. दादरच्या मकरंद सोसायटीसमोर जो रस्ता आहे तिथून मी येत होते. तेव्हा समोरुन शर्मिला आली आणि मला म्हणाली वंदूताई मी तुझ्यासोबत होते हं. मला काही कळलं नाही. नंतर मी पाहिलं तर तिच्या घराच्या गेटवर तिचे वडील वाट पाहत उभे होते. तेव्हा मला समजलं की हिचं काहीतरी सुरु आहे.'

'नंतर दोघंही एकमेकांना चिठ्ठ्या पाठवायचे. ते पोहोचवायचं काम माझ्याकडे असायचं. आजही आम्ही शेजारी आहोत आणि आमचं घरी येणं जाणं आहे.' असंही त्या म्हणाल्या. वंदना गुप्ते आगामी मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा' मध्ये दिसणार आहेत. याच सिनेमाच्या प्रमोशननिमित्त त्या अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला. सिनेमात रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर यांची मुख्य भूमिका असणार आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Raj Thackeray and Sharmila used to take the help of a Marathi actress vandana gupte to send love letters to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.