राहुल महाजनची लगीनघाई ‘कोल्हापुरी’ अमृताशी बांधणार लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 16:00 IST2016-03-23T23:00:49+5:302016-03-23T16:00:49+5:30

 वादात राहणारा राहुल महाजन मुळच्या कोल्हापुरी मुलीच्या प्रेमात पडला आहे. अमृता माने असे या मुलीचे नाव. मॉडेल असलेल्या अमृतासोबत ...

Rahul Mahajan's sparkline 'Kohalpuri' will be built by Amrita | राहुल महाजनची लगीनघाई ‘कोल्हापुरी’ अमृताशी बांधणार लगीनगाठ

राहुल महाजनची लगीनघाई ‘कोल्हापुरी’ अमृताशी बांधणार लगीनगाठ

 
ादात राहणारा राहुल महाजन मुळच्या कोल्हापुरी मुलीच्या प्रेमात पडला आहे. अमृता माने असे या मुलीचे नाव. मॉडेल असलेल्या अमृतासोबत राहुल तिसºयांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. अलीकडे एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राहुलने हे गुपित सांगितले. अगदी अमृता त्याला कुठे भेटली आणि कशी गठली, हेही त्याने सांगितले.  अमृता आणि राहुल केरळमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटले. याठिकाणी त्यांची ओळख झाली, मग मैत्री आणि मग प्रेम. अमृतासोबत लवकरच विवाहबंधनात अडकण्याची तयारी राहुलने चालवली आहे. राहुलचे हे तिसरे लग्न असेल. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राहुलने ‘राहुल दुल्हनियाँं ले जायेंगे’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून डिम्पी गांगुली हिच्या गळ्यात वरमाला टाकली होती. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर चारच महिन्यात राहुल शारिरीक छळ करीत असल्याची तक्रार डिम्पीने केली होती. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. काही महिन्यांपूर्वी डिम्पीने दुबईस्थित उद्योगपती रोहित रॉय याच्याशी विवाह केला होता.

Web Title: Rahul Mahajan's sparkline 'Kohalpuri' will be built by Amrita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.