कबाली प्रमोशनवेळी कुठे होती राधिका ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 13:13 IST2016-07-31T07:42:29+5:302016-07-31T13:13:00+5:30
सुपरहीट अभिनेता रजनीकांत यांच्या कबाली या चित्रपटाने ३०० करोडचा गल्ला बॉक्सआॅफीसवर कमविला आहे. अशा सुपर-डुपरहीट चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबत मराठमोळी ...
.jpg)
कबाली प्रमोशनवेळी कुठे होती राधिका ?
ुपरहीट अभिनेता रजनीकांत यांच्या कबाली या चित्रपटाने ३०० करोडचा गल्ला बॉक्सआॅफीसवर कमविला आहे. अशा सुपर-डुपरहीट चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे देखील या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिने रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री राधिका आपटे का दिसत नाही. हा प्रश्न सर्वच प्रेक्षकांना पडला आहे. याविषयी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेला विचारले असता, ती म्हणाली, कबाली या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहता न आल्याने मला देखील खूप वाईट वाटत आहे. पण सध्या मी घौल या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यामुळे माझं शेड्यूल व्यस्त असून माझ्याकडे प्रमोशनसाठी वेळच नव्हता. तसेच मला वाटतं की हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडत आहे. ही खूप चांगली बाब आहे. रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपचं छान होता. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या अनुभवांपैकी हा एक होता.