सामंथाच्या 'पुष्पा'मधील आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 16:50 IST2021-12-11T16:43:42+5:302021-12-11T16:50:21+5:30
सामंथा (Samantha)चे हे आयटम साँग यूट्यूबवर वारंवार पाहिलं जातंय आणि चाहत्यांना त्यांना खूप आवडलंय.

सामंथाच्या 'पुष्पा'मधील आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं गाणं
'पुष्पा'चा ट्रेलर रिलीज झालापासून.चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. निर्माते चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवण्यामध्ये कोणतीच कसर सोडत नाहीत. म्हणून त्यांनी ट्रेलरनंतर आणखी एक धमाका रिलीज केला आहे. पुष्पा (Pushpa)या चित्रपटाचे आयटम साँग रिलीज झाले आहे. ज्यामध्ये समंथा (Samantha) दिसत आहे. समंथाचा हॉट लूक पाहून सगळे घायाळ झाले. या गाण्याने इंटरनेटवर चांगलाच पार वाढवला आहे.
— Samantha (@Samanthaprabhu2) December 10, 2021
पुष्पाचे आयटम साँग रिलीज होणार असल्याचे सामंथाने त्याच्या सोशल मीडियावर अकांऊंटवर सांगितलं होतं.. हे गाणे आज रिलीज झाले असून या गाण्याने रिलीज होताच एकच खळबळ उडवून दिली आहे. हे गाणे यूट्यूबवर वारंवार पाहिले जातंय आणि चाहत्यांना त्यांना खूप आवडलंय.निर्मात्यांनी एका पोस्ट शेअर करुन गाण्याला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाल्याचे सांगितलं.
समांथाच्या या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलर आधीच यूट्यूबवर रेकॉर्ड बनवत आहे. या आयटम साँग यूट्यूबवर नवा बेंचमार्क सेट करत आहे. समंथा दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा’मधीलकाही मिनिटांच्या डान्स नंबरसाठी सामंथाने 1.5 कोटी रूपये इतके मानधन घेतलं आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती नाही.‘पुष्पा’ हा सिनेमा तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.