पुष्कर श्रोतीने का केली 'उबंतु' चित्रपटाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 10:58 IST2017-01-20T10:58:49+5:302017-01-20T10:58:49+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलचा नुकताच समारोप झाला आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष होते. या महोत्सवात अनेक कलाकरांचे ...

Pushkar Shruti Kya 'Ubant' film production | पुष्कर श्रोतीने का केली 'उबंतु' चित्रपटाची निर्मिती

पुष्कर श्रोतीने का केली 'उबंतु' चित्रपटाची निर्मिती

णे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलचा नुकताच समारोप झाला आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष होते. या महोत्सवात अनेक कलाकरांचे आणि दिग्दर्शकांचे व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. महेश मांजरेकर, रवी जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, नीलकांती पाटेकर अशा अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीविषयी असलेले विचार प्रेक्षकांसमोर मांडले. नुकतेच अभिनेता पुष्कर श्रोती यांनेदेखील उबंतु या चित्रपटाविषयी असलेले विचार मांडले. पुष्करने उंबतु या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मराठी सिनेमा टुडे' अंतर्गत 'उबंतु' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाविषयी अभिनेता पुष्कर श्रोती  सांगतो, मुलांच्या दृष्टीने शाळेचे नेमके महत्व कशात आहे हे सांगण्यासाठी 'उबंतु' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात बंद पडणारी एक शाळा चालू राहण्यासाठी त्या शाळेतील मुले कोणते धाडस करतात त्याची कथा सांगण्यात आली आहे. तसेच एका मित्राने मला शाळेसंबंधी एक कथासूत्र ऐकविल्यानंतर त्यावर एक छान चित्रपट होऊ शकतो हे माज्या लक्षात आल्यानंतर हा चित्रपट मी करायचे ठरविले. मात्र त्यासाठी मी खूप शाळांना भेटी देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती करून घेतली. या चित्रपटात काम करणाºया मुलांची मला अभिनयाच्या दृष्टीने 'कोरी पाटी' हवी होती व तो विचार करूनच सर्व नवखी मुले घेतली मात्र 'कार्यशाळेत' ती परस्परांशी इतकी एकरूप झाली की, माज्या दृष्टीने त्यांच्याकडून काम करून घेणे खूप सोपे गेले. या चित्रपटात कोणालाही मेकअप करण्यात आला नाही असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार सारंग साठे, संगीतकार कौशल इनामदार आणि पार्श्वसंगीतकार नरेंद्र भिडे उपस्थित होते.

Web Title: Pushkar Shruti Kya 'Ubant' film production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.