प्रियदर्शनचा प्राजक्तासोबत ‘धिंगाणा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 21:26 IST2016-03-31T04:26:50+5:302016-03-30T21:26:50+5:30
मराठी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी गाजवणाºया प्रियदर्शन जाधवला लोकप्रिय मराठी चित्रपट ‘टाईमपास २’ मध्ये अभिनेत्री प्रिया बापट सोबत दगडूची महत्त्वाची ...

प्रियदर्शनचा प्राजक्तासोबत ‘धिंगाणा’
म ाठी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी गाजवणाºया प्रियदर्शन जाधवला लोकप्रिय मराठी चित्रपट ‘टाईमपास २’ मध्ये अभिनेत्री प्रिया बापट सोबत दगडूची महत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली. प्रियाने या चित्रपटात प्राजक्ताची प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु आता आगामी चित्रपट ‘धिंगाणा’ साठी प्रियदर्शन जाधवला नवीन प्राजक्ता सापडली आहे. विविध विनोदी रिअॅलिटी शो मधून आपल्या समोर आलेली प्राजक्ता हनमघर त्याच्या सोबत ‘धिंगाणा’ मध्ये दिसणार आहे.
ममता प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट पूर्णत: मनोरंजक चित्रपट असणार आहे. समीर सदानंद पाटील निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर यांनी केले आहे. या जोडीसोबतच अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर आणि बालिवूड कलाकार रझा मुराद, अवतार गिल, शाहबाझ खान आणि कुनिका आदी कलाकार असणार आहेत.