प्रियदर्शन जाधवचा झक्कास सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 16:10 IST2017-02-11T10:36:40+5:302017-02-11T16:10:18+5:30
प्रत्येक व्यक्तीसमोर एक आदर्श व्यक्तीमहत्व असते. ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर असली तरी, त्या व्यक्तीचा आदर्श कोणीतरी ...

प्रियदर्शन जाधवचा झक्कास सेल्फी
प रत्येक व्यक्तीसमोर एक आदर्श व्यक्तीमहत्व असते. ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर असली तरी, त्या व्यक्तीचा आदर्श कोणीतरी असतोच. अशा या आदर्श व्यक्ती हा आपल्या समोर आला तर कोणाला त्या व्यक्तीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही. असेच काहीसे अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या बाबतीत घडले आहे. हो, खरचं अभिनेता प्रियदर्शन जाधव याने नुकतेच सोशलमीडियावर बॉलिवुडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्र याच्यासोबतचा एक झक्कास सेल्फी सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर त्याने शोले चित्रपटाचा डायलॉगदेखील पोस्ट केला आहे. असा हा बॉलिवुडचा लेजंड भेटल्याचा आनंद प्रियदर्शनच्या चेहºयावर उजळून दिसत आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कडक, राडा, नाइस म्हणत त्याच्या या सुंदर सेल्फीचे कौतुकदेखील करण्यात आले आहे. प्रियदर्शनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याची टाइमपास २ मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयीचा जादू दाखविली आहे. आता त्याचा सायकल हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. त्याचबरोबर तो प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटातदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. तसेच सध्या तो चला हवा येऊ दया या लोकप्रिय कॉमेडी शोच्या माध्यमातून सूत्रसंचालकाची जबाबदारी काही दिवस पार पाडताना पाहायला मिळणार आहे. निलेश साबळे याची तब्येत खराब असल्यामुळे त्याच्या जागी प्रियदर्शन जाधवची वर्णी लागली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
![]()