‘ती आणि इतर’सिनेमात प्रिया मराठेची आव्हानात्मक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 15:52 IST2017-04-03T10:22:55+5:302017-04-03T15:52:55+5:30
लवकरच ‘ती आणि इतर’ हा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, भूषण प्रधान, ...

‘ती आणि इतर’सिनेमात प्रिया मराठेची आव्हानात्मक भूमिका
ल करच ‘ती आणि इतर’ हा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, भूषण प्रधान, प्रिया मराठे अमृता सुभाष, आविष्कार दार्वेकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.प्रत्येक कलाकाराने या सिनेमात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मुळात या सिनेमाची कथा ही फक्त संध्याकाळी घडणा-या गोष्टींवर आधारित आहे. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत काय काय घडते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे आणि विशेष म्हणजे गोविंद निहलानी यांचा हा पहिला मराठी सिनेमा असून दिग्दर्शक आणि डीओपीसुद्धा गोविंद निहलानी हेच असल्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे प्रिया मराठेने सांगितले.या सिनेमात मी आणि भूषण कपल आहोत. आधुनिक विचारसरणी असणारे हे कपल आहे. मात्र काही वेळानंतर त्यांचे विचार बदलत जातात अशी ती भूमिका असून नक्कीच रसिकांना सिनेमातून एक चांगला मेसेज पाहायला मिळणार त्यामुळे आतापासूनच सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळतेय. तसेच याविषयी भूषणने सांगतिले की, चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांसमोर ते गुढ उलगडणार आहे. यामध्ये माझी भूमिका बायकोवर वर्चस्व गाजवणाऱ्या पतीची आहे. या चित्रपटात प्रिया मराठेने माझ्या बायकोची भूमिका साकारली आहे. अहंकारामध्ये वाहून गेलेला आणि बायकोला तिचे मत व्यक्त न करू देणाऱ्या पतीची भूमिका साकारण्याचा अनुभव फारच वेगळा होता. सुबोध, अमृता, सोनाली यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. तसेच गोविंद निहलानी हे बॉलिवुडमधील नामवंत दिग्दर्शक असले तरीही ते प्रत्येक कलाकाराचा प्रचंड आदर करतात. कलाकारांचे जर काही चुकले तर ते न रागावता शांतपणे समजावून सांगतात. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रेक्षकांना ती आणि इतर कोण आहे हे समजेल."