/> प्रत्येक कलाकारालाच आपली फिल्म ही फार जवळची असते. एखादा चांगला विषय हाती लागला की त्या संधीचे सोन करण्यासाठी आपले कलाकार देखील अपार मेहनत घेतात. आपले कॅरेक्टर्स सिनेमात प्रभावीपणे समोर यावे अन प्रेक्षकांना ते थेट अपील व्हावे यासाठी अभिनेत्यांची सतत धडपड सुरु असते. तर एखादा नवीन हटके प्रोजेक्ट मिळाला तर तो करण्यासाठी असलेली उत्सुकता अन एक्सायटमेंट देखील मोठ्या प्रमाणावर कलाकारांमध्ये दिसुन येते. आता पहा ना आपली ब्युटिफ्युल प्रिया बापट ही देखील तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी फारच एकासयटेड आहे. प्रियाने बºयाच दर्जेदार चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची मोहोर तर उमटविलीच आहे. आता ती सज्ज झाली आहे एका नव्या सिनेमासाठी. या सिनेमावर प्रियाचे काम सुरु असुन तिच्या चाहत्यांना ती लवकरच एका वेगळ््या भुमिकेत अन दमदार रोल मध्ये पहायला मिळणार आहे. खुदद प्रियानेच सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती म्हणतेय, मी लवकरच एक सिनेमा करतेय अन त्यासाठी खरच खुप एक्सायटेड आहे. माझे काम सुरु असुन मी आत्ताच काही या फिल्म बाबतीत सांगु शकत नाही. लवकरच तुम्हाला नव्या अपडेट्स मिळतील. प्रियाने जरी या चित्रपटाविषयी माहिती गुलदस्त्यात ठेवली असली तरी आपल्याला लवकरच या फिल्म विषयी नवे पैलु काही दिवसातच सापडतील हे मात्र नक्की.
{{{{twitter_video_id####}}}}
Web Title: Priya Exclusive New movie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.