प्रिया बेर्डे का म्हणतेय...माझी मुले समंजस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:52 IST2016-12-20T13:33:10+5:302016-12-21T16:52:27+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मोठा मुलगा अभिनय आता चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. सध्या अभिनयीच सिनेवर्तुळात आणि ...

प्रिया बेर्डे का म्हणतेय...माझी मुले समंजस
ल ्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मोठा मुलगा अभिनय आता चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. सध्या अभिनयीच सिनेवर्तुळात आणि पे्रक्षकांमध्ये देखील जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच त्याच्या पहिला चित्रपट ती सध्या काय करतेय प्रदर्शित होतोय. पण तुम्हाला हे माहितीय का, अभिनयला एक लहान बहिण पण आहे. स्वानंदी ही प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची छोटी मुलगी. अभिनय देखील आपल्या बहिणीची अगदी मोठ्या भावाप्रमाणे सतत काळजी घेत असतो. प्रियाने आपल्या या दोन क्युट मुलांविषयी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, अभिनय आपल्या बहिणीची एखाद्या समंजस आणि थोरल्या भावासारखीच काळजी घेत असतो. विशेष म्हणजे स्वानंदीही त्याची काळजी घेते. दोघांचं आता एकमेकांशी असलेलं 'बाँडिंग' इतकं जबरदस्त आहे, की कधी कधी मलाही थक्क व्हायला होतं. या दोघांसारखी समंजस मुलं असल्यामुळे मी स्वत:लाच खूप भाग्यवान समजते. मला अभिनयात अजून खूप शिकायचे आहे. पाया मजबूत करुन लांबचा पल्ला गाठायचा आहे, असे अभिनयने एका मुलाखतीत सांगितले. अभिनयला विनोदी भूमिकांपेक्षा गंभीर आणि वास्तववादी भूमिका करायला अधिक आवडतात. आई प्रिया बेर्डेकडून तो अभिनयाचे धडे गिरवतोय. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर स्वानंदी फक्त चार वर्षांची होती. आज अभिनय १९ तर स्वानंदी १६ वर्षांची आहे. स्वानंदी आता अकरावीत शिकत आहे. अभिनय मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे आता अभिनय आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेतोय. 'ती सध्या काय करतेय' या सिनेमातून अभिनय रुपेरी पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. पुढील वर्षी म्हणजे ६ जानेवारी २०१७ रोजी अभिनयचा हा पहिला सिनेमा रिलीज होतोय. सतीश राजवाडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनयसोबत आर्या आंबेकर, अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान या कलाकारांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत.
![]()