प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतचा रोमँटिक फोटो, पाहून म्हणाल सो स्वीट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 16:05 IST2021-03-11T16:04:44+5:302021-03-11T16:05:28+5:30

प्रिया आणि उमेशचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ पाच तासांच 50 हजाराहून लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

Priya Bapat shared a romantic photo with Umesh Kamat | प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतचा रोमँटिक फोटो, पाहून म्हणाल सो स्वीट...

प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतचा रोमँटिक फोटो, पाहून म्हणाल सो स्वीट...

ठळक मुद्देप्रियाने शेअर केलेल्या या फोटोत प्रिया आणि उमेश यांच्यातील रोमँटिक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रियाने पती उमेश कामतसोबतचा एक रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांमधलं जबरदस्त बॉन्डिंग दिसतेय.

प्रियाने शेअर केलेल्या या फोटोत प्रिया आणि उमेश यांच्यातील रोमँटिक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रिया आणि उमेशचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ पाच तासांच 50 हजाराहून लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. चाहत्यांनी प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांचे खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.

उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.

Web Title: Priya Bapat shared a romantic photo with Umesh Kamat