माझा एल्गार चित्रपटाचा प्रिमीयर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 03:37 AM2017-11-11T03:37:04+5:302017-11-11T09:07:04+5:30

अन्याय सहन न करता त्याविरोधात प्रतिकार करण्याचा संदेश देणाऱ्या माझा एल्गार या चित्रपटाचा भव्य प्रिमीयर शो नुकताच मुंबईत संपन्न ...

The premiere of my Elgar film | माझा एल्गार चित्रपटाचा प्रिमीयर

माझा एल्गार चित्रपटाचा प्रिमीयर

googlenewsNext
्याय सहन न करता त्याविरोधात प्रतिकार करण्याचा संदेश देणाऱ्या माझा एल्गार या चित्रपटाचा भव्य प्रिमीयर शो नुकताच मुंबईत संपन्न झाला. चित्रपटातील स्टारकास्टसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. श्रद्धेच्या नावाखाली ह्ल्ली जो अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे त्याचं वास्तव दाखवण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे. वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निर्माता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला सामाजिक संदेश देण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न माझा एल्गार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून झाल्याची भावना उपस्थित प्रेक्षकांनी या प्रिमीयर प्रसंगी व्यक्त केल्या. 

श्री सद्गुरू फिल्म्स प्रस्तुत व मिलिंद कांबळे दिग्दर्शित माझा एल्गार चित्रपटात ऐश्वर्या राजेश व यश कदम या नव्या जोडीसोबत स्वप्नील राजशेखर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे तर संगीत सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

श्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्यावर ‘माझा एल्गार’ हा चित्रपट भाष्य करतो. गावातल्या एका अपप्रवृत्तीच्या महंता विरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा दाखवतानाच तरुणाईने मनात आणलं तर ते समाजात नक्कीच चांगला बदल घडवू शकतील हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा धूर्त महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष यात पहायला मिळेल. या संघर्षात तरुणीला कोणाकोणाची साथ मिळेल? व हा लढा ती कशाप्रकारे लढेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’  मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना...अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.

Web Title: The premiere of my Elgar film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.