प्रथमेश परब घेत आहे डान्सवर मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 12:02 IST2017-02-06T06:32:54+5:302017-02-06T12:02:54+5:30
प्रत्येक व्यक्ती ही चंदेरी दुनियेच्या प्रेमात पडलेली असते. मात्र ही चंदेरी दुनिया दिसते तितकी सोपी नसते. इथे स्वत:ला प्रुफ ...
.jpg)
प्रथमेश परब घेत आहे डान्सवर मेहनत
प रत्येक व्यक्ती ही चंदेरी दुनियेच्या प्रेमात पडलेली असते. मात्र ही चंदेरी दुनिया दिसते तितकी सोपी नसते. इथे स्वत:ला प्रुफ करण्यासाठी सडेतोड मेहनत घ्यावी लागते. ज्यावेळी तुम्ही जीवाचे रान करता त्यावेळी यश तुमच्या हाती लागते. असेच काहीसे कठोर प्रयत्न अभिनेता प्रथमेश परब करताना पाहायला मिळत आहे. नुकताच प्रथमेशने सोशलमीडियावर एक डान्स व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याचबरोबर डान्समध्ये अधिक सक्षम बनण्यासाठी ही प्रॅक्टीस सुरू असल्याचे त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले. त्याच्या या डान्स व्हिडीओला सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आपल्या डान्स मेहनतीविषयी प्रथमेश लोकमत सीएनएक्सला सांगतो, सध्या प्रत्येक क्षेत्र हे खूपच स्पर्धात्मक झाले आहे. स्पर्धेत स्वत:ला प्रुफ करायचे असेल तर मेहनत ही करावीच लागेल. हाच विचार करून डान्समध्ये अधिक सक्षम होण्यासाठी हा सराव जोरात सुरू आहे. तसेच मला स्वत:लादेखील डान्स करायला फार आवडते. तसेच आताच्या या ग्लॅमरस दुनियेत पूर्वीपेक्षा थोडा बदल जाणवत आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये डान्स न करता आला तरी चालत होते. त्यावेळी फक्त अभिनयाला महत्व होते. आता मात्र हे चित्र बदलले आहे. सध्या तुम्हाला फक्त अभिनय येऊन चालत नाही. त्याबरोबर डान्स, स्टंट या सर्व गोष्टीदेखील महत्वाच्या असतात.
प्रथमेश परबने यापूर्वी बालक पालक, टाइमपास, ऊर्फी, लालबागची राणी असे अनेक सुपरहीट चित्रपट त्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. टाइमपासमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर तो बॉलिवुडचा तगडा कलाकार अजय देवगणसोबतदेखील दृश्यम या चित्रपटात पाहायला मिळाला.
{{{{twitter_post_id####

}}}}Practing and improving dance with #victoriousdanceacademypic.twitter.com/RlmPNpoDDs— Prathamesh Parab (@pprathameshp) February 5, 2017