प्रशांत दामलेंची गुप्तहेरगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:40 IST2016-04-09T22:40:13+5:302016-04-09T15:40:13+5:30

रंगभूमीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते प्रशांत दामले सध्या खासगी गुप्तहेरगिरी करीत आहेत. एका ...

Prashant Damle's espionage | प्रशांत दामलेंची गुप्तहेरगिरी

प्रशांत दामलेंची गुप्तहेरगिरी


/>
रंगभूमीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते प्रशांत दामले सध्या खासगी गुप्तहेरगिरी करीत आहेत. एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनसाठी त्यांची ही गुप्तहेरगिरी सुरु आहे. प्रशांत दामलेंच हे मिशन नेमकं कुठलं आहे? यासाठी आगामी भो भो  सिनेमाची वाट पहावी लागेल. २२ एप्रिलला येणाऱ्या भो भो  या सिनेमातून प्रशांत दामले मराठी रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक करतायेत.

प्रशांत दामले यांनी व्यंकटेश भोंडे नावाच्या गुप्तहेराची भूमिका भो भो  चित्रपटात साकारली आहे. चित्रपटातल्या या भूमिकेविषयी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, अतिशय वेगळ्या ट्रीटमेंटने हा चित्रपट पुढे सरकतो. बाहेरच्या जगात गुप्तहेर म्हणून वावरत असलेल्या व्यंकटेश भोंडेचं व्यक्तिगत जीवन यासोबत गुप्तहेरगिरीमुळे त्याने स्वतःच ओढवून घेतलेले काही प्रसंग ह्याची उत्तम सांगड घालत दिग्दर्शक भरत गायकवाडने एक अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे.

भो भो  ह्या चित्रपटातील भूमिका माझ्या कारकिर्दीतली सर्वात वेगळी भूमिका ठरेल असा विश्वास प्रशांत दामले यांनी व्यक्त केला आहे. ह्यसुमुखेश फिल्म्सह्ण प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित-दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर सिनेमात प्रशांत दामले यांच्यासोबत सुबोध भावे, संजय मोने, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, अनुजा साठे, किशोर चौगुले, केतकी चितळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. भो भो  चित्रपट २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Web Title: Prashant Damle's espionage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.