मराठी अभिनेत्याच्या पत्नीची ज्योतिर्लिंग यात्रा सुफळ संपूर्ण, शेअर केला भावुक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:11 IST2025-12-26T18:09:50+5:302025-12-26T18:11:54+5:30
लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या पत्नीनं १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा यशस्वीपणे पुर्ण केली आहे.

मराठी अभिनेत्याच्या पत्नीची ज्योतिर्लिंग यात्रा सुफळ संपूर्ण, शेअर केला भावुक अनुभव
Manjiri Oak Jyotirlinga Yatra : अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. प्रसाद ओक आणि मंजिरीने मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. प्रसाद हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोघांचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच मंजिरी ओकनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मंजिरी ओक हिने १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा यशस्वीपणे पुर्ण केली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. या यात्रेची सांगता गुजरातच्या सोमनाथ मंदिरात झाली.विशेष म्हणजे, या शेवटच्या टप्प्यात मंजिरीचा मोठा मुलगा सार्थक ओक तिच्यासोबत होता. मुलासोबत ही वारी पूर्ण करणे हा मंजिरीसाठी आनंदाचा क्षण ठरला.
आपल्या भावना व्यक्त करताना मंजिरी म्हणाली, "नमस्कार... आणि अशा रीतीने माझी ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण झाली. यावेळी म्हणजेच सोमनाथ दर्शनाला माझा मोठा मुलगा सार्थक माझ्याबरोबर होता, हा एक वेगळाच आनंद आहे. या संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रेचा अनुभव फारच कमाल होता. विलक्षण होता, कधी ही विसरणार नाही असा होता.महादेवाच्या कृपेनी हे व्रत पार पडलं. हर हर महादेव", या शब्दात तिनं आपला अनुभव व्यक्त केला. तिच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय.