Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:44 IST2022-11-30T17:53:23+5:302022-11-30T18:44:24+5:30
प्रसाद ओकने नुकतीच राज्याचे सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे.

Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी..
प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. प्रसादने शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. अशीच एक त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
प्रसाद ओकने नुकतीच राज्याचे सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान मराठी सिनेसृष्टीसंदर्भात अनेक विषयांवर प्रसादनं चर्चा केल्याचं सांगितलं.
प्रसादची पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत आनंदाची बातमी"
काल मा.श्री.सुधीरजी मुनगंटीवार ( सांस्कृतिक आणि वन मंत्री, महाराष्ट्र राज्य ) साहेबांना भेटलो. नाटक, चित्रपट, मालिका सर्व क्षेत्रातल्या अनेक अडचणी त्यांनी समजून घेतल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी चित्रपटाला जर "राष्ट्रीय पुरस्कार" मिळाला तर त्याला दुप्पट सबसिडी मिळायला हवी अशी मागणी मी केली असता साहेबांनी अत्यंत मोठ्या मनानी त्वरित हि मागणी मंजूर केली आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश दिले. तसेच OVERALL सबसिडी ची रक्कम सुद्धा वाढवायचा प्रस्ताव त्त्यांच्यासमोर मांडला आहे. आणि थकीत सबसिडी लवकरात लवकर देण्याचाहि प्रस्ताव मांडला गेला..त्यालाही त्यांचा सकारात्मक प्रतिसाद होता. या निर्णयामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांना बळ मिळेल अशी आशा वाटते.
नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल, मल्टिप्लेक्स मधल्या prime time shows बद्दल सुद्धा चर्चा झाली.
या प्रसंगी श्री महेश कोठारे सर,
श्री संदीप घुगे( अध्यक्ष, भा ज पा चित्रपट युनियन ), आमचे मित्र निर्माते संतोष आयाचित आणि सुनील भोसले, श्री. संजय कृष्णाजी पाटील आणि इतर बरेच मान्यवर उपस्थित होते.
मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब,
आपण ज्या आत्मीयतेने आणि खूप वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.