बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:19 PM2022-06-13T14:19:38+5:302022-06-13T18:56:18+5:30

Dharmveer Marathi Movie ON OTT : होय, आता ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकणार आहात. 2022 मधील हा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होतोय.

prasad oak Dharmaveer Marathi OTT Release on ott platform zee5 | बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज

बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज

googlenewsNext

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’  (Dharmaveer : Mukkam Post Thane Marathi Movie) या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. अभिनेता प्रसाद ओक  (Prasad Oak ) याचा चित्रपटातील जिवंत अभिनय पाहून सगळेच भारावले. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे ( Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही लक्षवेधी कामगिरी केली. महाराष्ट्रभर या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. गेल्या 13 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं अगदी हिंदी चित्रपटांनाही मागे टाकलं. आता हा सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकणार आहात. होय, लवकरच 2022 मधील हा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतोय. अभिनेता प्रसाद ओकने स्वत: एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ( Dharmveer on ZEE5  )

प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘धर्मवीर आता Zee5 वर...!! माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म तो धर्मवीर येतोय 17 जूनपासून थेट तुमच्या भेटीला... 2022 चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट, फक्त Zee5वर,’ असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट महाराष्ट्रातील 400 हून अधिक स्क्रिन्स व 10 हजारहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरूवात केली होती. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 9.59 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण 13.87 कोटींची कमाई केली होती. तर 10 दिवसांत 18.03 कोटींचा बिझनेस केला होता. या चित्रपटावर 8 कोटी खर्च झाला होता. हा खर्च तीनच दिवसांत वसूल झाला होता.

Web Title: prasad oak Dharmaveer Marathi OTT Release on ott platform zee5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.