फोटोत दिसली प्रार्थना बेहेरेची परफेक्ट फिगर, कमेंट्सचा होतोय वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:08 IST2021-05-24T18:07:12+5:302021-05-24T18:08:48+5:30

प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोत ती प्रचंड फिट दिसत असून तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

prarthana behere flaunted perfect figure, picture viral on social media | फोटोत दिसली प्रार्थना बेहेरेची परफेक्ट फिगर, कमेंट्सचा होतोय वर्षाव

फोटोत दिसली प्रार्थना बेहेरेची परफेक्ट फिगर, कमेंट्सचा होतोय वर्षाव

ठळक मुद्देप्रार्थनाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात आपल्याला तिची परफेक्ट फिगर पाहायला मिळत आहे.

प्रार्थना बेहेरेच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. मराठीतील अतिशय सुंदर अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रार्थनाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात आपल्याला तिची परफेक्ट फिगर पाहायला मिळत आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोत ती प्रचंड फिट दिसत असून तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 92 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो सोशल मीडियावर लाईक केला आहे. तू प्रचंड फिट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 


प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: prarthana behere flaunted perfect figure, picture viral on social media